Title | : | Hool |
---|---|---|
Author | : | Bhalchandra Nemade |
Release | : | 2021-12-14 |
Kind | : | audiobook |
Genre | : | Fiction |
Preview Intro | |||
---|---|---|---|
1 | Hool | Bhalchandra Nemade |
बाहेरच्या जगाचा दैनंदिन काळ आणि चांगदेवच्या व्यक्तिनिष्ठ काळामधील ताण याचं सुरेख वर्णन या कादंबरीत आढळतं. आधुनिक काळातील व्यक्तीची स्वविषयक जाणीव आणि भोवतालच्या सामाजिक वास्तवासंबंधीची जबाबदारीची जाणीव त्यांच्यातील संघर्षापासून सामानतेपर्यंतचे विविध प्रकारचे संबंध आणि ताणतणाव नेमाड्यांनी अत्यंत समर्थपणे 'हूल'च्या रुपबंधातून अभिव्यक्त केले आहेत. नेमाड्यांनी केलेल्या चर्चा- कादंबऱ्यांतील सामूहिक अवकाशांशी, वास्तव जीवनातील समस्यांशी घट्टपणे निगडीत आहेत. हा सामूहिक अवकाश आणि चांगदेवला उपलब्ध झालेला खासगी अवकाश यांच्यातील द्वंद्व या कादंबऱ्यांमधून अत्यंत वेधकपणे मूर्त झाले आहे. ऐका भालचंद्र नेमाडेलिखित 'हूल' शंभू पाटील यांच्या आवाजात! |