Title | : | The Teaching of Ramana Maharshi |
---|---|---|
Author | : | Arthur Osborne |
Release | : | 2023-09-30 |
Kind | : | audiobook |
Genre | : | Religion & Spirituality |
Preview Intro | |||
---|---|---|---|
1 | The Teaching of Ramana Maharshi | Arthur Osborne |
श्री रमण महर्षींना भारतातील सर्वाधिक महत्वाच्या सार्वकालिक ऋषींमध्ये स्थान दिले जाते. वयाच्या सतराव्या वर्षी त्यांना अध्यात्मिक जागृतीचा अनुभव आला त्यानंतर ते अरूणाचलाच्या पवित्र पर्वतरांगांमध्ये गेले. त्यांच्याभोवती शिष्यांचा परिवार गोळा झाला आणि बघता बघता त्यांची संख्या वाढत गेली. तिथे त्यांच्या सान्निध्यात आलेल्या कार्ल युंग, हेन्री कार्टियर -ब्रेमेन, सॉमरसेट मॉम यांसारख्या प्रभावी लेखक, कलाकार आणि मानसशास्त्रज्ञांच्या जीवनाला त्यांचा परिसस्पर्श झाला. आजवर लाखो लोकांना त्यांच्या शिकवणीतून प्रेरणा मिळते आणि यापुढे लाखो लोकांना ती मिळत राहिल. आर्थर ऑस्बोर्न या त्यांच्या शिष्याने संपादित केलेल्या या पुस्तकांतून त्यांच्या विचारांचा खजिना सर्वसामान्यांसाठी खुला झाला आहे. आत्मविचार ही मुक्तीची गुरूकिल्ली आहे असे ते सांगतात. त्यांच्या विचारांत एकाचवेळी वस्तुनिष्ठ तरीही अतिशय जिव्हाळ्याचं स्पष्टिकरण व्यक्त झालेलं आहे. |