Title | : | KRUSHNAKANYA |
---|---|---|
Author | : | Ratnakar Matkari |
Release | : | 2021-08-25 |
Kind | : | ebook |
Genre | : | Short Stories, Books, Fiction & Literature |
Size | : | 3899208 |
गेली साठहून अधिक वर्षं रत्नाकर मतकरींचं कथालेखन अविरत चालू होतं. शैली कोणतीही असो, मतकरींनी कायम शोधला, तो माणसातला ‘माणूस.’ म्हणूनच नियतीची चेष्टितं, काळ, मृत्यू अशा अनादि-अनंत संकल्पनांची चित्तवेधक रचना करीत वाचकाला गुंगवून टाकणाऱ्या मतकरींच्या वैविध्यपूर्ण कथा चिरस्मरणीय ठरल्या. ‘कृष्णकन्या’ ही मतकरींचा परीसस्पर्श असलेल्या अशाच अनोख्या कथांची अमूल्य भेट. मतकरींच्या शेवटच्या अप्रकाशित कथांपैकी निवडक कथा प्रथमच पुस्तकरूपात आणणारा संग्रह म्हणूनही ‘कृष्णकन्या’चं महत्त्व अनन्यसाधारण असंच. |